जव्हार फाटा ते वेळुंजे रस्त्याचे काम कासव गतीने : आमदारांच्या सूचनांना केराची टोपली

सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

जव्हार फाटा ते वेळुंजे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याबाबत नेहमीच लोकांमध्ये संताप व्यक्त केला जातो. परंतु संबंधित प्रशासनासह ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या कामाला ग्रहण कायम आहे. जून मध्ये या रस्त्याचे कार्यरंभ आदेश निघून आता सहा महिने पूर्ण होऊनही अद्यापही ह्या रस्त्याचे काम लटकलेले आहे. एक महिन्यापासून जागोजागी खड्डे भरण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यांच्यावर कोणाचा वचक आहे का नाही अशी शंका प्रवाशांसह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या नावाखाली रखडलेले काम होऊन आता तरी रस्ता होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांना वाटत असताना रस्ता चालू होण्याचे चिन्ह दिसत नाही. प्रशासन व ठेकेदार पुढील पावसाळ्याची वाट पाहत आहे काय ?असा सवाल लोक विचारत आहेत.

आमदारांनी अडीच महिन्यापूर्वी ह्या कामाचे उदघाटन केले. अधिकारी व ठेकेदार यांची मनमानी झाली असून स्वतःची जहागिरी असल्या सारखे वागत आहे. ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा. दुसऱ्याला टेंडर द्या. लोकांची अडवणूक कशासाठी ?  रस्ता इतका खराब झाला आहे की, मोटारसायकल धारक दररोज खड्ड्यात जखमी होत आहे. एखादा प्रसंग घडल्यास संबंधित विभाग व ठेकदारावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात येतील.

- समाधान बोडके, शिवसेना तालुका समन्वयक

संबंधित प्रतिनिधीने बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी असता फोन उचलला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. विशेष म्हणजे आमदार हिरामण खोसकर यांनी या कामाचे उघाटन करून जवळ जवळ अडीच महिने झाले. यावेळी आमदार खोसकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना सक्त ताकीद देऊन लवकर हा रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. असे असताना आमदारांच्या सुचनांना सुद्धा केराची टोपली दाखवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ह्या मार्गावरील सगळे खड्डे योग्य रीतीने भरण्याचे नागरिकांनी आवाहन केले आहे, काही ठिकाणी खड्डे भरण्यास टाळाटाळ होत आहे. गेल्या एक महिन्या पासून नुसते खड्डेच भरत असून कामाला गती देण्याची ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!