जळवात व होमिओपॅथी

मित्रांनो, आता हिवाळा अगदी जोरात आहे आणि अशा वातावरणात काही लोकांना 'जळवात'चा त्रास होतो. या लेखात आपण याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.

- डॉ. प्रदीप व डॉ. चैताली बागल, इगतपुरी

या आजाराचे कारण काय ?
काही आजारांचे निदान आपल्या आहारामध्ये सापडतं जसे की आपला आहार ऋतूनुसार असला पाहिजे. आहारामध्ये जर खूप रुक्षता असेल ; चिवडा, मसाला, उष्ण व तिखट पदार्थ किंवा अति थंड पदार्थ यामुळेच शरीरातील स्निग्धांश कमी होतो आणि परिणामतः आपले शरीर रुक्ष बनते. तसेच ज्या व्यक्तींचा खूप वेळ पाण्यामध्ये किंवा मातीशी संपर्क येतो त्यांच्यात हा आजार खूप प्रमाणात आढळतो. बहुतांश प्रमाणात ही कारणं असली तरी काही लोकांना उष्ण/थंड व कोरडे हवामान मानवत नाही. उष्ण/थंड व कोरड्या वातावरणामध्ये तसेच धुळीमुळे देखील त्वचा कोरडी बनते. त्यामुळे सर्रास जळवात झालेले पहायला मिळते. पायांना भेगा पडण्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे पायामधील तेलाच्या ग्रंथीमधील तेल निघून जातं आणि त्वचा कोरडी पडू लागते. थंडीच्या दिवसात ही त्वचा अधिक कोरडी होऊ लागते. त्यामुळे थंडी असो वा उष्मा. दोन्ही ऋतूंमध्ये आपली पायाची/हाताची त्वचा आपण मॉईस्चराईज करणं अत्यंत गरजेचं आहे.

आजाराची लक्षणे काय आहेत ?
जळवातमध्ये हातापायाची कातडी निघतात. तळहात व  तळपाय यांची कातडी कोमल होते. त्यांना भेगा पडतात. कधीकधी भेगांमधून रक्त पण येते. अशा जागी कडकपणा येतो त्यामुळे त्वचा थोडीफार इकडे तिकडे हलवली तरीदेखील खूप दुखते.

जळवातच्या आजारांमध्ये काय उपाय करता येईल ?
१) पहिला उपाय म्हणजे आहारात बदल करणे ऋतूनुसार हिवाळा पावसाळा उन्हाळा आहारात बदल करावा.
२) आपण जर चप्पल वापरत असाल व घर्षणामुळे त्वचा कोरडी बनत असेल तर चपली ऐवजी नरम बूट वापरावे, सॉक्स वापरावे.
3) एखादे मॉइश्चरायझर त्याजागी लावावे.
4) दररोज सकाळी आंघोळ करण्याच्या अगोदर डाळीच्या पिठाची पेस्ट हातापायाला लावावी. ज्यामुळे जळवात बरी होण्यास मदत होते. पण हा प्रयोग सातत्याने एक महिना करावा. साबणाचा वापर टाळावा.
5) पायांना जर भेगा पडल्या असतील किंवा हातांना भेगा  पडल्या असतील तर प्रामुख्याने हात व तळपाय कोमट पाण्यामध्ये बुडून धुऊन घ्यावे. पाच मिनिटात स्वच्छ धुतल्यानंतर तळपायाला किंवा हातांना खोबरेल तेलाने मालिश करावी. त्यानंतर त्यावर धूळ बसू देऊ नये. पायात बूट सॉक्स वापरावे.

हे काही पथ्य पाळा
जळवातिच्या आजारांमध्ये काही पथ्य पाळले पाहिजे. उदाहरणार्थ खूप रूक्ष ( कोरडा,जसे की बिस्कीट, खारी, टोस्ट, कोरड्या भाज्या ) आहार  टाळावा. शिळे व आंबट पदार्थ टाळावे. अति मीठ खाणे टाळावे, आंघोळीच्या वेळी साबण लावू नये. ‌अशा प्रकारे आपण काळजी घ्यावी.

आता वळूयात ह्या आजारासाठी उपचार काय आहेत याकडे !
होमिओपॅथी औषध शास्त्रामध्ये यासाठी पेशंटचा पूर्ण इतिहास, स्वभावातले बारकावे इत्यादी बाबी लक्षात घेऊन औषधोपचार केल्याने हा आजार नक्कीच बरा होतो. लेखासोबत आमच्या क्लिनिकला होमिओपॅथी उपचार घेऊन 3 आठवड्यातच बदल झालेला अलीकडच्याच एका पेशंटचे फोटो पोस्ट करत आहे.
होमिओपॅथीने निश्चितच फार लवकर आपल्याला या आजारात आराम मिळतो. तेव्हा आपल्याला हा लेख कसा वाटला हे आमच्या व्हाट्सएप नंबर वर कळवायला विसरू नका. कुणी पेशंट असतील तर त्यांनाही हा लेख पुढे पाठवा.

संपर्कासाठी – डॉ. प्रदिप व डॉ. चैताली बागल, मातोश्री होमिओपॅथी क्लिनिक, वरची पेठ, इगतपुरी, जि. नाशिक 9270118140

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!