बेलगाव तऱ्हाळेच्या उपसरपंचपदी संतोष वारुंगसे यांची बिनविरोध निवड : माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

इगतपुरी तालुक्यातील प्रतिष्ठित व राजकीय चळवळीचे गाव म्हणून परिचित असलेल्या बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष शिवाजी वारुंगसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. बेलगाव तऱ्हाळेचे लोकनियुक्त सरपंच अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेत एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी संतोष शिवाजी वारुंगसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पॅनलचे मार्गदर्शक तानाजी आव्हाड, अशोक आव्हाड, विजय कर्डक, शशिकांत आव्हाड, बाळू वारुंगसे, विष्णू वारुंगसे, संतोष वारुंगसे. विठ्ठल तातळे, पोपट मोरे, संजय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड झाली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंकुश मोरे, सुवर्णा आव्हाड, प्रमिला वारुंगसे, सुशीला तातळे, बबाबाई मोरे, ग्रामसेविका संगीता गोसावी सभेला उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. यावेळी रामकृष्ण वारुंगसे, अनिल सोनवणे, भरत वारुंगसे, मनोहर वारुंगसे, सोपान वारुंगसे, शिवाजी कड, सुरेश कड, विलास हेमके, शंकर पानेकर, जनार्दन वारुंगसे, काशीनाथ शिंदे, राहुल वारुंगसे, मनोहर खराटे, नारायण कडवे आदींसह ग्रामस्थ, महिला युवक उपस्थित होते.

बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीचे कामकाज लोकाभिमुख असून सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गावविकासासाठी सर्वाना सोबत घेऊन प्रयत्न करू. माझ्यावर दिलेली जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडू असे मनोगत नवनिर्वाचित उपसरपंच संतोष वारुंगसे यांनी केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!