नामदेव नामदेव नामदेव नामदेव सगळीकडे फक्त नामदेवच….! मुंढेगाव येथील हरिनाम सप्ताहातील सर्व सेवा होणार फक्त नामदेव नावाच्या व्यक्तींकडूनच..!

१८ ते २५ जानेवारीला होणार नामदेव नावाचा अनोखा हरिनाम सप्ताह

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

प्रारंभापासून अखेरच्या दिवसांपर्यंत म्हणजेच ७ दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी फक्त “नामदेव” नावांचेच प्रवचनकार, कीर्तनकार, मृदंगमणी, गायक, टाळकरी, चोपदार, विणेकरी, अन्नदाते असणार आहेत. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील गतीर बंधू यांनी ह्या जगावेगळ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. १८ ते २५ जानेवारी पर्यंत होणाऱ्या ह्या सप्ताहात तब्बल ५१ पेक्षा जास्त “नामदेव” नावाचे व्यक्ती सेवा देणार आहेत. संतशिरोमणी नामदेव महाराज सप्तशताब्दीशतकोत्तर सुवर्ण महोत्सव अर्थात नामदेव महाराजांच्या जन्माला ७५१ वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर हा नामसंकीर्तनन महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी नामदेव महाराज गाथा पारायण सोहळा होणार आहे.

अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ग्रामीण भागातील प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. ह्या माध्यमाद्वारे सुसंस्कारी पिढी घडवण्याचे महत्कार्य घडते. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे गतीर बंधू यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. त्यांच्या मोठ्या कुटुंबात वारकरी परंपरेनुसार प्रत्येकजनांकडे काही ना काही कला विकसित झालेली आहे. ह्या परिवाराने स्वतःच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. ह्या हरिनाम सप्ताहाला पहिल्या दिवसापासून काल्याच्या किर्तनापर्यंत शेकडो जणांचे हात लागत असतात. यामुळेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतो. हा सप्ताह राज्यभरात प्रसिद्धी पावलेला आहे. यावर्षी ह्या सप्ताहाचे आगळेवेगळे वैशिष्ठ्य आहे. सप्ताहासाठी फक्त “नामदेव” ह्या नावाचे लोक विविध अध्यात्मिक सेवा पार पाडणार आहेत

नामदेव महाराज गाथा प्रवचनाची सेवा नामदेव महाराज डोळस, नामदेव महाराज गोईकने, नामदेव महाराज सूर्यवंशी, नामदेव महाराज बैरागी, नामदेव महाराज सारूक्ते, नामदेव महाराज नाडेकर हे करतील. सायंकाळी ६ ते साडेआठ पर्यंत नामदेवांच्या अभंगावरील किर्तनसेवा डॉ. नामदेव महाराज शास्त्री दुधाटे, नामदेव महाराज बोगीर, नामदेव महाराज शास्त्री देगलुरकर, विष्णुदास नामदेव महाराज ठवळे, नामदेव महाराज शेकटेकर, नामदेव महाराज लभडे, नामदेव महाराज घुले यांच्याद्वारे होईल. काल्याचे कीर्तन नामदेव महाराज घुले यांचे होईल. रोज सकाळी नाष्टा नामदेव गवारी, नामदेव खोकले, नामदेव कौटे, नामदेव शेरे, नामदेव दराणे, नामदेव नाडेकर, नामदेव सूर्यवंशी यांच्याकडून तर दुपारचे भोजन संत नामदेव महाराज पंढरपूर, नामदेव हाडके, कै. नामदेव नागरे, नामदेव किर्वे, नामदेव होगे, नामदेव गतीर, नामदेव सदगीर यांच्याकडून देण्यात येईल. रात्रीचा भोजन प्रसाद नामदेव जाधव, कै. नामदेव राव, नामदेव भोर, नामदेव नाठे, नामदेव दराणे, नामदेव जाधव, संत नामदेव महाराज पंढरपूर यांच्याकडून देण्यात येणार आहे. महाप्रसादाचे अन्नदान कै. नामदेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. हरिपाठ सेवा संयोजन संत नामदेव महाराज हरिपाठ मंडळ मुंढेगाव, मृदंगमणी नामदेव महाराज डोळस, नामदेव महाराज गोडसे, गायनाचार्य व टाळकरी म्हणून नामदेव महाराज गोईकने, नामदेव महाराज साबळे, नामदेव महाराज गतीर, नामदेव महाराज तांगडे, किर्तनसेवा विणेकरी नामदेव महाराज राघो गतीर, किर्तनसेवा चोपदार नामदेव महाराज भटाटे, नामदेव महाराज गतीर तर मंडप व्यवस्था नामदेव मंडप डेकोरेटर्स जिव्हाळे यांनी केली आहे.

कार्यक्रमाच्या प्रसंगी नामदेव महाराज वाघ, नामदेव महाराज सहारे, नामदेव महाराज थेरे, नामदेव महाराज म्हसणे, नामदेव महाराज खातळे सदिच्छा भेट देतील. कलशपूजन नामदेव बाबा पुजारी,  दीपप्रज्वलन नामदेव चव्हाण, वीणा पूजन नामदेव कडू, मृदंग पूजन नामदेव शेरे, टाळ पूजन नामदेव चव्हाण, ग्रंथ पूजन नामदेव होगे, प्रतिमा पूजन नामदेव म्हसणे, गाथा पूजन ध्वज पूजन नामदेव छबाजी गतीर, मंडप पूजन नामदेव पांडुरंग गतीर, गाथा पूजन नामदेव सुरेश गतीर यांच्याकडून करण्यात येईल. यासह नामदेव नावाच्या भाविकांनी सप्ताहाला सदिच्छा भेट दिल्यास त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. संपूर्ण सातही दिवस विणेकऱ्याकडून नामदेव जनाबाई असा अखंड नामजप केला जाईल. ह्या नामदेव नावाच्या अनोख्या अखंड हरिनाम सप्ताहाला राज्यभरातून अनेक भाविक उपस्थित राहणार आहेत. मुंढेगाव येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दि. १८ ते २५ जानेवारीला होणाऱ्या ह्या नामसंकीर्तन सोहळ्याला भाविक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन हभप गतीर बंधू मुंढेगाव यांनी केले आहे. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!