इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
भारत सरकारचा “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” २०२१-२२ यात इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उभाडे या जिल्ह्यातील एकमेव शाळेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. ह्या शाळेचे राष्ट्रीय पातळीवर नामांकन झाले आहे. नाशिक जिल्ह्यातून हा बहुमान एकमेव जिल्हा परिषद शाळेला मिळाला असून आज नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती उभाडे आणि सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच संतोष पदमेरे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गीता गोणके, अर्चना परदेशी, मुख्याध्यापक अनंत भदाणे, जगदिश खैरनार, संजय गातवे, गणपत मराडे, सुमन बारे, संध्या देशमुख, मंजुषा अहिरे विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश सुरुडे, मोहिनी पदमेरे यांना सन्मानित करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, ग्रामपंचायत उभाडे, ग्रामसेवक खेबडे, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, केंद्रप्रमुख पांडुरंग शिंदे, विस्ताराधिकारी आर. पी. नेरे आदींचे शाळेसाठी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.