हरसुलला उद्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर : इंजि. विनायक माळेकर, मिथुन राऊत यांचे आयोजन

राहुल बोरसे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागात प्रथमच मोफत भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि. विनायक माळेकर, युवा नेते मिथुन राऊत यांनी दिली. हरसूल येथे नाशिकच्या तुलसी आय हॉस्पिटलच्या मार्फत खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून उद्या गुरुवारी हरसूल ग्रामपंचायत हॉलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उदघाटक म्हणून खासदार हेमंत गोडसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हिरामण खोसकर, प्रमुख पाहुणे म्हणून हरसूल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या इंजि. रुपांजली माळेकर उपस्थित राहणार आहेत.

हरसूल भागात प्रथमच भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. रुग्णांनी मोठ्या संख्येने शिबिरासाठी उपस्थित राहून तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचे आवाहन आयोजक इंजि. विनायक माळेकर, शिवसेना तालुका समन्वयक समाधान बोडके, युवा नेते मिथुन राऊत, हरसुलच्या सरपंच सविता गावित, उपसरपंच राहुल शार्दूल, नितीन देवरगावकर, वामन खरपडे यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!