महायुतीचे उमेदवार आमदार हिरामण खोसकरांच्या प्रचारार्थ उद्या इगतपुरीत ९ वाजेपासून विविध कार्यक्रम : महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा केला निश्चय 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ इगतपुरी येथे उद्या सकाळी ९ वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीतील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजेपासून इगतपुरी गावठा येथून अभूतपूर्व रॅली होणार आहे. हिरामण खोसकर यांच्या विजयासाठी संपूर्ण महायुती सज्ज होऊन कामाला लागली असून उद्या सर्वांची एकजूट दिसून येणार आहे. हिरामण खोसकर यांना निवडून आणण्यासाठी महायुतीने प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी केली आहे. दिवसेंदिवस हिरामण खोसकर यांना दोन्हीही तालुक्यात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांचा विजय पक्का असल्याचे नागरिक म्हणतात. उद्या इगतपुरी येथील प्रचार कार्यक्रमाला महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!