इगतपुरीच्या लग्नातील ६ लाख ११ हजारांच्या चोरीप्रकरणी ३ आरोपी पोलिसांकडून चतुर्भुज ; एकजण फरार :  चोरट्यांना दागिन्यांसह ४८ तासांत पकडण्याची इगतपुरी पोलिसांची कामगिरी यशस्वी

वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

इगतपुरी शहरातील मुंबई आग्रा महामार्गाच्या परिसरातील गावठा येथे असलेल्या कॅपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्न सोहळा सुरू असतांना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत  ताराचंद केवलचंद बबेरवाल रा. घोटी यांनी फिर्याद दाखल केली होती. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे व पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी तातडीने शोध पथक नेमुन महाराष्ट्र पोलीस ग्रुप व्हॉटस ॲप ग्रुपच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला. परिसरातील फोटो शुटींगच्या आधारे तपास सुरू केला असता पोलीस ग्रुपच्या आधाराने आरोपी व त्यांचे मोबाईल नंबर मिळून आले. तपासाचे चक्र वेगाने फिरवत असतांना सबंधित आरोपी मुंबई येथील मिरा भांईदर परीसरात असल्याचे मोबाईल लोकेशन आढळले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी काशमीरा पोलीस मुंबई यांना तपासाकामी मदतीला घेत घटनेतील आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले. यात तीन आरोपी मिळाले असून यापैकी एकाने पळ काढल्याने तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलीसांनी आरोपीना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.

सुमारे ६ लाख ११ हजार रूपये किंमतीचे चोरी झालेले सोन्याच्या दागिन्यांपैकी पैकी ५ लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडे मिळुन आला. या घटनेतील आरोपी १) अतिश अमर ससोदिया, वय २० वर्ष, रा. पोस्ट पिपलीया ता. पचौर जिल्हा राजगड, मध्यप्रदेश २) निखिल रवि ससोदिया, वय, १९ वर्ष, रा. पिपलीया, मध्यप्रदेश ३) करण महाविर सिंग, वय २३ वर्ष, रा. पडकोली पो. पुराकनेरा ता. बहा, जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश तर चौथा आरोपी विकास सालकराम सिसोदिया फरार असुन पोलीस शोध घेत आहे. इगतपुरी पोलीसांनी केवळ महाराष्ट्र पोलीस व्हॉटस ॲप ग्रुपच्या आधारे अट्टल गुन्हेगारांचा शोध ४८ तासांत लावल्याने तालुक्यात व जिल्ह्यात इगतपुरी पोलीसांच्या कामगिरीबद्धल अभिनंदन होत आहे. पोलिसांनी या घटनेत अतिदक्षता आणि कर्तबगारी दाखविल्याने नागरिकांनी इगतपुरी पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे व पोलीस पथकांचे कौतुक केले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, सहा. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव, पोलीस नाईक मुकेश महिरे, पोलीस कॉ. सचिन बेंडकुळे, राजेंद्र चौधरी, बोराडे, विजय रूद्रे आदि करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!