लढवय्या आमदार कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या स्मरणार्थ उद्या सांजेगाव येथे भव्य कमानीचे उदघाटन : गोरख बोडके, नीता गोवर्धने यांनी स्वखर्चाने उभारली कमान

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

भाताचा ऐतिहासिक लढा उभारून इगतपुरी तालुक्याचे नाव देशभर गाजवण्यात लढवय्या आमदार कर्मवीर महर्षी पुंजाबाबा गोवर्धने यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे मूळ गाव आणि वास्तव्य सांजेगाव असून हा परिसर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यानुसार लढवय्या आमदार कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धन यांच्या स्मरणार्थ सांजेगाव येथे भव्य कमान उभारण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आणि सांजेगावच्या लोकनियुक्त सरपंच नीता शंकर गोवर्धने यांच्या स्वखर्चाने बांधलेल्या ह्या कमानीचे भूमिपूजन उद्या मंगळवारी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्या सायंकाळी ४ वाजता ह्या कमानीच्या उदघाटन कार्यक्रमाला नागरिकांसह हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!