इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी धामडकीवाडी येथे भावली खुर्दच्या ग्रामसेविका रुपाली जाधव यांच्या सहकार्याने जयबद्री विशाल संस्था नाशिक यांनी आदिवासी बांधवाना थंडीपासून संरक्षणासाठी ऊबदार ब्लॅंकेट वाटप केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांना पुरीभाजी जेवण वाटप करण्यात आले. जयबद्री विशाल संस्थेमार्फत नाशिक, पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यात आदिवासी वाड्यापाड्यांवर दरवर्षी जीवनावश्यक साहित्याचे वाटप होत आहे. त्यांच्या अनमोल भेट वस्तूंमुळे धामडकीवाडीतील ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमासाठी जयबद्री विशाल संस्थेचे सदस्य जानकीराम पाटील, अरुण सिन्हा, अनिता सिन्हा, योगरतन सिन्हा, अनिल पाटील, अशोक कुमार, पी. अगोने, प्रमोद पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तू निसरड, गोकुळ आगिवले, चांगुणा आगिवले, बबन आगिवले, खेमचंद आगिवले, लहानू आगिवले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group