शिक्षक भारती संघटनेच्या विविध पदांवर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

  इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनमान्य संघटना असणारी शिक्षक भारती ही संघटना आहे. शिक्षकांचे प्रश्न अविरतपणे सोडवण्यासाठी शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी लढणाऱ्या संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार अकोले कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी मॉडर्न ज्युनिअर कॉलेज अकोले येथील संपत वाळके, कार्याध्यक्षपदी अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपुरचे गणपत धुमाळ, शिक्षकेतर संघटनेचे नेते योगेश देशमुख यांची अहमदनगर जिल्हा समन्वयक पदी निवड झाली. संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे सरचिटणीस महेश पाडेकर, सल्लागार कैलास राहणे, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे, सचिन जासूद, अकोले माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, बाळासाहेब भोत, पंडित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

आगामी काळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक भारती संघटना आणि नूतन पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहे. याप्रश्नांवर शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी या सर्व अधिकाऱ्यांसमवेत आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत सहविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडवण्याचे काम केले जाणार आहे. जेथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अडचण येणार तेथे शिक्षक भारती त्यांच्यासमवेत उभी राहील असे प्रतिपादन योगेश देशमुख यांनी केले. याप्रसंगी पोपटराव उकिरडे, चंद्रकांत नवले, संजय गुगळे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, अमोल चंदनशिवे, रूपाली कुरुमकर, माफीज इनामदार, संदीप वर्पे, सचिन लगड, संजय तमनर, रूपाली बोरुडे, गोवर्धन रोडे, संजय भालेराव, दादासाहेब कदम, संतोष निमसे, श्याम जगताप, प्रवीण मते आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!