
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील दरेवाडी येथे एका १० वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात मुलगा जागीच ठार झाला आहे. दिपक विठ्ठल गावंडा असे मृत मुलाचे नाव असुन शेतात बकऱ्या चारत असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असुन या दुर्देवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
या भागात या आधी देखील अशा घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. बिबट्या मादी जातीची असून तिच्या सोबत ३ पिल्ले देखील असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या परीसरात तात्काळ पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे. सदरची घटना सायंकाळी घडल्यावर देखील रात्री साडेसात पर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी न पोहचल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.