अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष खडताळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे या देशभर मराठी भाषिक साहित्यिक व चळवळीसाठी काम करणाऱ्या साहित्यिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक देविदास खडताळे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा उपक्रमाचे आयोजक नवनाथ अर्जुन पाटील गायकर यांनी दिली आहे.

ऐन सत्तरीतही चिरतरुण असणारे व या वयातही तरुणांना लाजवेल असा दांडगा उत्साह व हौस असलेले खडताळे सर आजही तितक्याच तडफेने कार्यरत असुन परिषदेच्या विविध कार्यक्रमात हिरीरीने सहभागासह मार्गदर्शनही सातत्याने करत असतात. त्यांचा वाढदिवस ३० डिसेंबरला असुन या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांच्या वतीने विविध साहित्यिक उपक्रमाचें व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धाचें आयोजन करण्यात आले असुन काव्यस्पर्धा कालावधी २५ ते ३० डिसेंबर असा आहे. या स्पर्धाचें संकलन श्रीराम तोकडे हे करणार असुन स्पर्धा परिक्षण प्रशांत भरवीरकर, नारायण गडाख व आशा गोवर्धने हे करणार आहेत. सर्वतीर्थ टाकेद येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातंर्गत आंतरशालेय काव्यस्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी इ. ५ ते ८ वी व इ. ९ ते १२ असे दोन गट करण्यात आले आहे. या स्पर्धाचें संयोजन प्राचार्य साबळे सर, ग्रंथपाल राजेंद्र गायकवाड यांचेसह सर्व शिक्षक करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!