इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
शैक्षणिक कार्याबरोबरच शिक्षणसंस्थांनी सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेऊन समाजासाठी कार्य करणे गरजेचे आहे. यासह समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या भेटीप्रसंगी प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते. याप्रसंगी समितीचे चेअरमन प्रा. आर. एम. कुलकर्णी, प्रा. डॉ. दिलीप बेलगांवकर, प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे, प्रा. डॉ. जी. के. सानप, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात जाणे आवश्यक असून समाजातील वंचित घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धतील सुनंदा खडके ( प्रथम ), रेखा भांगरे ( द्वितीय ), सोनाली नाठे ( तृतीय ), अश्विनी शेळके ( उत्तेजनार्थ ) तसेच कुस्ती स्पर्धेतील योगराज आडोळे, वासुदेव भगत, राहुल भगत, माधवी डाके व वक्तृत्व स्पर्धेतील गायत्री शिंगोटे , सारिका पाळदे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे चेअरमन प्रा. आर. एम. कुलकर्णी, सदस्य प्रा. दिलीप बेलगांवकर, प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे, प्रा .डॉ. जी. के. सानप यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. एस. के. शेळके, प्रा. एच. आर. वसावे. प्रा. डॉ. के. एम. वाजे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. आभार प्रा. ए. वाय. सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.