वाडीवऱ्हे इन्फिलूम कंपनी कामगारांतर्फे सिटूचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. कराड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व सिटूचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांचा वाढदिवस वाडीवऱ्हे येथील इन्फिलूम इंडिया प्रा. लि. कंपनी कामगारांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांचा ६५ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी सिटू भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी एकूण ८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सीबी टोल झोपडपट्टी येथे शालेय वस्तूंचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्र्यंबकेश्वर आधारतीर्थ आधार आश्रम येथे इन्फिलूम इंडिया प्रा. लि. वाडीवऱ्हे या कंपनीतील कमिटी सदस्य व कामगार यांच्यावतीने या आश्रमातील आत्महत्याग्रस्त, कोरोनाने मयत झालेल्यांच्या १२० मुलं, मुली यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व अल्पोपहार देण्यात आला. यावेळी सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. सीताराम ठोंबरे, कॉ. संतोष काकडे, कॉ. भिवाजी भावले, कॉ. व्यंकट कांबळे, कॉ. सतिश खैरनार, कॉ. भूषण सातळे, कॉ. गौतम कोंगळे व इन्फिलूमचे कमेटी मेंबर अशोक राव, शरद बोराडे, हिरामण भोर, नरेंद्र लवांड, अशोक कदम, प्रमिला सोनवणे, सोमनाथ शेजवळ, विवेक ढगे व कामगारवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!