पाडळी देशमुख फाट्यावर मोटारसायकली एकमेकांवर धडकल्याने अपघात : अपघातात ४ जण जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख फाट्यावर मोटारसायकली एकमेकांवर धडकल्याने सकाळी 9 च्या सुमाराला अपघात झाला. यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नाशिककडून येणारी मोटारसायकल आणि पाडळी देशमुख फाट्यावर रस्ता ओलांडून जाणारी मोटारसायकल यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात यशोदा ज्ञानेश्वर भागवत वय वय ३९ रा. मुकणे, संतोष अशोक क्षीरसागर वय १७, रा. मुकणे, विनायक जयराम गोडे वय 21, रा. पिंपळगाव डुकरा, सीता बाबानंद बोरा वय 27, रा. गोंदे दुमाला हे चौघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!