इगतपुरीत स्वातंत्र्यदिनी ‘व्यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रम : इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसतर्फे वीरांच्या वारसांचा सन्मान

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इगतपुरीत स्वातंत्र्यदिनी व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रम संपन्न झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक येथे हा कार्यक्रम साजरा करून स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. इगतपुरीच्या भुमीपुत्रांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची जाण ठेवत आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते त्यांच्या वारसांचा पुष्पगुच्छ व प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

तालुक्यातील स्वातंत्र्यवीर भुमिपुत्र जगन्नाथ पासलकर, नेमिचंद पारख, लालचंद पारख, राधाकृष्ण चंद्रात्रे या वीर योध्यांनी शौर्याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यामुळे इगतपुरी तालुक्याचा नावलौकिक देशभरात पोहोचला. या वीर योध्यांनी देशाचे स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसांचा मी ऋणी असुन स्वातंत्र्यवीरांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आमदार हिरामण खोसकर म्हणाले. या कार्यक्रमात अनंत महादेव पासलकर, आकाश पारख, अजित पारख, दत्तात्रय राधाकृष्ण चंदात्रे आदी स्वातंत्र्य वीरांच्या वारसांचा पुष्पगुच्छ व प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, शहराध्यक्ष संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर कडु, सत्तार मनियार, सोमनाथ भोंडवे, कमलाकर नाठे, निवृत्ती कातोरे, भास्कर जोशी, प्रकाश तोकडे, उत्तम भोसले, भास्कर गुंजाळ, शहर उपाध्यक्ष बाबु कवठे, राजेंद्र शिंदे, पिंटु मिस्त्री, फारुख खान, गणेश भोंडवे, तुषार सकट, अरुण उबाळे, विश्वजित आहिरे, बॉबी भोंडवे, राजु अवघडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.