शासकीय आश्रमशाळेतील १५ वर्षीय मुलीची आत्महत्या : आत्महत्येचे कारण अस्पष्ट

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल जवळील बोरीपाडा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेली रोहिणी बापू वड वय 15 वर्षे, रा. खडकओहोळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक या विद्यार्थिनीने आज दुपारी आत्महत्या केली. दुपारी बाराच्या सुमारास वस्तीगृहातील स्वतःच्या खोलीमध्ये ओढणीने पंख्याला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे. याबाबत हरसुल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. हरसूल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासकार्य केले. शवविच्छेदन पंचनामा करून अंत्यविधीसाठी मृतदेह घरच्यांच्या ताब्यात दिला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!