इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
हरसूल जिल्हा परिषद गटातील विविध गावात भजनी मंडळांना भजनी साहित्य नसल्यामुळे अध्यात्मिक कार्याला मोठ्या अडचणी सोसाव्या लागत होत्या. याबाबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर यांना माहिती समजली. त्यांनी वारकरी परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे भजनी साहित्य भजनी मंडळांना भेट दिले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते मिथुन राऊत, महादेवनगरचे सरपंच विष्णु बेंडकोळी, विठ्ठल पवार, नामदेव वाघेरे, रवी वाघेरे आदी उपस्थित होते.
भजनी साहित्यात टाळ, मृदंग, पखवाज, वीणा आदी साहीत्य भेट देण्यात आले. यामुळे ग्रामीण भागात वारकरी संप्रदाय वाढवण्यात महत्वपुर्ण योगदान मिळणार आहे, गावोगावी भजनी साहित्य दिल्याने वारकरी भजनी मंडळीनी आनंद व्यक्त केला आहे. भजनी साहित्य उपलब्ध झाल्याने गावोगावी टाळ मृदंगाच्या सुमधुर आवाजात भजनी परंपरा अखंड सुरू होणार आहे. वारकऱ्यांचे आधारस्तंभ हरसूल गटाचे नेते विनायक माळेकरांनी दिलेल्या महत्वपुर्ण योगदानामुळे वारकरी परंपरा आणि भजनी मंडळ यांच्या कार्याचा आलेख उंचावणार असल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त करून आभार मानले आहेत.
विनायक माळेकर यांनी गावोगावी दिलेल्या भजनी साहित्यामुळे वारकरी संप्रदाय वाढीसाठी मोठा फायदा होऊन भजन किर्तनाचा आनंद वाढणार आहे. यामुळे सुजाण पिढी निर्मित होईल.
- सोमनाथ महाराज बेंडकोळी, महादेवनगर