इगतपुरीनामा न्यूज – रोटरी क्लब ऑफ नाईन हिल सिटी अध्यक्ष गोरख बोडके यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून त्यांनी महामार्गावर दक्ष राहून कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १०० रिफ्लेक्टिव जॅकेट दिले आहे. कोरोनाच्या भयानक काळात त्यांनी सर्वात पुढे राहून पोलीस प्रशासन आणि नागरिकांसाठी केलेले मोलाचे सहकार्य अविस्मरणीय आहे. यापुढेही चांगले काम करण्यासाठी गोरख बोडके यांच्याकडून पोलिसांना नियमित प्रोत्साहन लाभेल अशी आशा नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे गोरख बोडके यांच्या सहकार्यातून १०० रिफ्लेक्टिव जॅकेट आज सुपूर्द करण्यात आले. आडगाव येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ हिल नाईन सिटी अध्यक्ष गोरख बोडके यांनी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या ताब्यात हे जॅकेट दिले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी पाटील साहेब उपस्थित होते. ऊन, वारा, पाऊस आणि थंडीमध्ये नागरिकांसाठी डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या कार्याचा अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी रिफ्लेक्टिव जॅकेट देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाईन हिल सिटी यांची मदत लाभली. नागरिकांसाठी दक्षतेने कार्य करणाऱ्या पोलिसांसाठी काम करतांना आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया गोरख बोडके यांनी यावेळी दिली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group