
इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
जय भीम हा सिनेमा भारतीय समांतर सिनेमाच्या इतिहासातला पुढचा टप्पा गाठणारा ठरला आहे. या सिनेमाने अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक अशा विषयांना स्पर्श केलेला आहे. त्याच्या विविध पैलूंचा बारकाव्याने अभ्यास आज भारतभर केला जातो आहे. भारतीय सिनेमा शंभर वर्षाच्या झाल्यानंतर असा सिनेमा येणं हा देखील महत्त्वपूर्ण असा योगायोग आहे. प्रगतिशील लेखक संघ शाखा नाशिक व ईप्टा नाशिक यांच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुख प्रा. डॉ. नागार्जुन वाडेकर हे आपले मत मांडणार आहेत. त्याचबरोबर या चर्चेमध्ये तल्हा शेख कॉम्रेड महादेव खुडे असे मान्यवर आपापली मते मांडणार आहेत. हा परिसंवाद हा खुल्या स्वरूपाचा असून यामध्ये उपस्थित प्रेक्षक आणि श्रोत्यांना देखील आपली मत मांडता येणार आहे.
प्रगतिशील लेखक संघ या 90 वर्षापेक्षा अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीने देशभर अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक व्यक्तीस आपली एक सांस्कृतिक भूमिका असते आणि ती त्याने जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढील आठवड्यात औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या *दलित अधिकार अधिवेशन निमित्ताने* जयभीम या सिनेमाचा हा खुला परिसंवाद आदिवासी दलित बहुजन महिला यांच्या सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी त्याचबरोबर आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्या शनिवारी 11 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता कॉम्रेड दत्ता देशमुख हॉल ल, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, खरबंदा पार्क, द्वारका, नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन या स्क्रीनिंग्ज शोसाठी उपस्थिती नोंदवावी असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रमोद आहेर, सरचिटणीस प्रल्हाद पवार यांनी केलेले आहे. या स्क्रिनींग शोसाठी प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सचिव राकेश वानखेडे, कॉम्रेड राजू देसले, तल्हा शेख, विराज देवांग, अर्पिता, अपूर्व इंगळे यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.