मविप्रचे वैद्यकीय महाविद्यालय आणि कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र आडगाव आणि कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी विविध रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत ९७१ आजार १२१ पाठपुरावा सेवांवर मोफत उपचार मिळणार आहेत. सर्व प्रकारच्या दुर्धर शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, डायलिसिस यासारखे आजार व अपघात यावर मोफत उपचार होणार असल्याचे माजी सरपंच पांडुरंग खातळे यांनी सांगितले. मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयात अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी, मूत्रपिंड व मूत्रविकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थीरुग्ण व अपघाती आजार, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, नेत्रविकार व शस्त्रक्रिया, फुफ्फुस आजारावरील उपचार, इंटरव्हेशनल रेडिओलॉजी, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया यावरील वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया महाविद्यालयात मोफत केल्या जाणार आहेत.

या शिबिराचा अनेक नागरिकांनी फायदा घेतला. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरवर्ग व त्यांची सर्व टीम उपस्थित होती. मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे, माजी सरपंच पांडुरंग खातळे, तुकाराम खातळे, लक्ष्मण खातळे, अशोक आघाण, संजय खातळे, भरत खातळे, संदीप खातळे, पुंजाराम सायखेडे, एकनाथ सायखेडे, रामचंद्र खातळे,  निवृत्ती खातळे, मदन खातळे, संतु पा.खातळे, तुकाराम भवर, हिरामण निमसे, राजाराम खातळे, विशाल खातळे, रामदास मडके, सारुक्ते सर, ग्रामसेवक मोंढे भाऊसाहेब, मुख्याध्यापक बिरारी सर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!