घोटी येथील जनता विद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना

इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथील जनता विद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज जाधव, सदस्य प्रशांत पिचा, विशाल पिचा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्राचार्य साहेबराव पाटील यांनी उपस्थितांना विज्ञान विषयाची गोडी लागण्यासाठी अंतराळ वीरांबद्दल माहिती, चांद्रयान ३ बद्धल माहिती दिली. अमेझॉनच्या जंगलातून औषधी वनस्पतींचा शोध घेऊन औषध तयार करण्याचा संपूर्ण प्रवास त्यांनी सांगितला. जीवनात विज्ञानाचे अन्यन्यसाधारण महत्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना सांगितले. यावेळी विज्ञान छंद मंडळ प्रमुख अविनाश निकम यांनी विज्ञानाचे महत्व, संपूर्ण वर्षाचे नियोजन सांगितले. यामध्ये क्षेत्र भेटी, विविध शास्त्रज्ञ जयंत्या, पुण्यतिथी, विज्ञान विषयक वस्तूंचा संग्रह, विज्ञानावर आधारीत चित्रपट, प्रयोग सादरीकरण, कात्रणे जमा करणे या सर्व विषयांचा परामर्श केला. पर्यवेक्षक अर्जुन कासार, जेष्ठ शिक्षक नवनाथ जाधव, जयवंत भामरे आदी शिक्षक उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!