इगतपुरीनामा न्युज, दि. 7
इगतपुरी तालुक्यातील आवळखेड जवळ काराची वाडी येथील लक्ष्मण कामडी यांच्या घरात 8 फुटी अजगर जातीचा साप आढळला. ह्या घटनेची माहिती सर्पमित्र मनोज पवार यांना दूरध्वनीद्वारे दिली असता त्यांनी घटनास्थळावर घरी जाऊन अजगराला पकडले. अजगराला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पकडलेल्या अजगराला कसारा घाटातील जंगलात सोडून देण्यात आले.
प्रत्येक सजीवांचे जैव विविधता आणि अन्नसाखळीमध्ये आपापले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व व महत्व आहे. हे आपण जाणून घेतले पाहिजे. त्या जीवाचा कळत नकळत फायदा होत असतो. तो आपल्याला जाणवत नाही. म्हणून प्रत्येक सजीवांचे रक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे. आवळखेड येथील काराची वाडीतील लक्ष्मण कामडी यांच्या घरात 8 फुटी अजगर दडून बसला होता. कामडी यांनी तात्काळ सर्पमित्र मनोज पवार यांना पाचारण केले. सर्पमित्रांनी या अजगराला जेरबंद केले. भक्ष्याच्या शोधात हा अजगर आल्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्पमित्र मनोज पवार यांनी ह्या 8 फुटी अजगराला कसारा घाटातील जंगलात सोडून दिले.