
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यावर सणासुदीच्या दिवशीच खून झाल्याची घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे ही घटना झाली आहे. भुषण लहामगे असे दुर्दैवी युवकाचे नाव असून तो जिल्हा स्तरीय कुस्तीपटू असल्याचे समजते. कोयत्याने वार आणि गोळी घालून ही हत्या झाल्याचे समजते. बंदुकीचे तीन चार राऊंड फायर झाले असल्याची ह्या भागात चर्चा आहे. युवकाची हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत. वाडीवऱ्हे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. भर महामार्गावर खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून मारेकऱ्यांचाकसून शोध सुरू करण्यात आला आहे.