
इगतपुरीनामा न्यूज – श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरी येथे आज मोठ्या उत्साहात ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक सुहास राजमाने यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सूतगिरणीचे संस्थापक हातकणंगलेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश सर्वांना वाचून दाखवण्यात आला. येत्या मार्चमध्ये मोठ्या दिमाखात श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचा शुभारंभ होणार आहे. शेकडो महिलांना हक्काचा रोजगार मिळवून दिला जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील महिलांनी चालवलेली महिलांची पहिली सूतगिरणी राज्यासाठी आदर्श ठरेल अशा शुभेच्छा आमदार डॉ. अशोकराव माने यांनी दिल्या. कार्यक्रमावेळी संचालक दत्तू काळे, व्यवस्थापक ईश्वर जाधव, अशोक कदम, बाबू पाटील, योगेश पाटील, प्रवीण पाटील, लक्ष्मण मोरे, ग्रामसेवक भाऊसाहेब, अशोक सुरुडे, नंदू गोलवड, माजी सरपंच उंबरे, बाळू सुरुडे, महेश भोर, योगेश सुरुडे, एकनाथ वारुंगसे, ग्रामस्थ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.