47 व्या महाराष्ट्र स्टेट रोईंग चॅम्पियन पंकज वड याचा हरसुलकरांकडुन सत्कार

इगतपुरीनामा न्युज, दि. 7 

पंकज वड याने अनिकेत तांबे सोबत रोइंगमध्ये चंदेरी कामगिरी केली. हरसूल क्रिकेट संघाचा ऑल राऊंडर पंकज वड याची राष्ट्रीय रोईंग  स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. पंकजने पुणे युनिव्हर्सिटीमधून खेळत ओपन गटातून सांघिक गोल्ड आणि सिल्व्हर मेडल मिळवले. महाराष्ट्र स्टेट कडून त्यांची नॅशनलसाठी निवड झाली आहे.
नाशिक येथे NWSA या क्लब कडून पंकजा सराव करतो. शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंबादास तांबे हे त्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत. हरसूलचे सुहास वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो क्रिकेट मधून रोइंगकडे वळवुन त्याने आपली दिशा बदलवली. नाशिकचा आंतरराष्ट्रीय रोईंग खेळाडू दत्तू भोकनळ यांचा आदर्श घेऊन पंकज वड याने सुयश संपादन केले आहे. तो पुन्हा राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उंचावेल यासाठी युवा नेते मिथुन राऊत, हिरामण गावित, उपसरपंच राहुल शार्दुल, अशोक लांघे, जेष्ठ नेते वामन खरपडे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश जाधव, किशोर मराठे, पांडुरंग टोपले यांनी पंकज वड यांचा सत्कार करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!