देशाची संस्कृती आणि परंपरांद्वारे विधायक कार्य करुन आदर्श समाज घडवावा – सद्गूरू कृष्णानंद महाराज : सद्गुरू कबीर सेनेचे तिसरे राष्ट्रीय संमेलन उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

देशाची संस्कृती आणि परंपरांद्वारे विधायक कार्य करुन आदर्श समाज घडवावा. ह्यातूनच देशाला उच्चतम समृद्धीकडे नेण्याचा राजमार्ग सद्गूरु कृष्णानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनाद्वारे साधकांना सांगितला. साधनेच्या मार्गावर अग्रेसर होऊन एकसंघ हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा. आपल्या सकारात्मक विचारांना गती द्या असेही प्रतिपादन संद्गूरू कृष्णानंद महाराज यांनी यावेळी उपस्थितांना केले.

सद्विप्र समाज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व दिव्य गुप्त विज्ञानाचे प्रणेते व वर्तमान काळाचे सद्गुरु स्वामी कृष्णानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत सद्गुरुधाम आश्रम, वार्ली पाडा ( करंज ), शिरोळ येथे सद्गुरु कबीर सेनेचे तृतीय राष्ट्रीय संमेलन पार पाडले. यावेळी ते बोलत होते. कसारा शिरोळ वर्ली पाडा सद्गूरू धाम आश्रमात संपन्न झालेल्या राष्ट्रीय संमेलनाद्वारे त्यांनी उपस्थित असलेल्या साधकांना तसेच शिष्यगण यांना सद्गूरू कबीर सेनेच्या कार्यप्रणाली बाबत मार्गदर्शन केले. साधकांनी संघटनात्मक कार्य करुन सृजनशिल समाजाचीही स्थापना करण्यासह आजच्या युवा वर्गाने व्यसनमुक्त होऊन सत्यप्रवृत्तीचा विकास करुन राष्ट्रहिताच्या मार्गाचा अवलंब करावा असेही आवाहन त्यांनी केले.

सद्विप्र समाज सेवा सद्गूरू कबीर सेनेचे तिसरे संमेलन असल्याने देशभरातुन साधक आणि शिष्य गण या संमेलनात आवर्जुन उपस्थित झाले होते. कार्यक्रमाला सद्गुरु कबीर सेनेचे अध्यक्ष कुणालस्वामी,  उपाध्यक्ष आचार्य संतोषजी , परम आचार्या आशाजी, माँ आदीश्रीजी, माँ अनंतेश्वरीजी, आचार्य सुनीलजी ( राष्ट्रीय संघटक सद्विप्र समाज सेवा ), संतप्रमुख आचार्य जनेश्वर स्वामी, विविध राज्यातील अध्यक्ष, विस्तारक व इतर सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व सद्विप्र समाज सेवा पदाधिकारी आणि अनेक राज्यातील  सद्विप्र समाज सेवेचे साधक बंधु भगीनी उपस्थित होते. राष्ट्रीय संमेलनात सद्गुरु कबीर सेनेचे उद्दीष्ट स्पष्ट करणारा ठराव मांडण्यात आला. बहुमताने ठरावास अनुमोदन प्राप्त झाले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य संतोष शर्मा यांनी केले. साधकांना विविध तर्‍हेचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला. यावेळी सद्गुरुदेव वर्तमान काळात उज्वल भविष्याची बिजे पेरुन वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेला मुर्तरुप देण्याचा सत्यसंकल्प घेऊन त्यावर अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!