इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून ५ टक्के रक्कम खर्च करण्यासाठी मी अभिवचन देतो. यासह दिव्यांगांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आढावा बैठक घेण्यात येईल असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी केले. इगतपुरी येथील पंचायत समिती सभागृहात जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती सोमनाथ जोशी होते. त्यांनी पुढे म्हटले की, प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांग व्यक्तींवर ५ टक्के निधी खर्च होण्याबाबत जातीने लक्ष घातले जाईल.
यावेळी उपसभापती विठ्ठल लंगडे, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, सरपंच अनिल भोपे, इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, हेमलता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले केले. अध्यक्षीय भाषण करतांना सभापती सोमनाथ जोशी म्हणाले की, दिव्यांग बांधव संदर्भात पंचायत समितीच्या सर्व प्रकारच्या योजनांची काटेकोरपणे अंबलबजावणी करण्यासाठी दक्षता घेण्यात येईल. याप्रश्नी दिव्यांगांच्या नेहमीच सोबत राहून सक्रिय राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले
कार्यक्रमप्रसंगी , शिवसेना माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, अनिता घारे, सिद्धार्थ भोईर, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसारे हजर होते. या कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज म्हसणे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मानकर, इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, उपाध्यक्ष सपन परदेशी, विलास कनकट, अशोक ताथेड, मंगेश शिंदे, वैशाली कर्डक, पवन रुपवटे, मुक्ता गोवर्धने, सुनील पगारे आदींनी केले होते.