खेड भैरव येथील छोट्या धरणाला छिद्रे पडल्याने पाण्याचा अपव्यय : संबंधितांचे धरणाकडे लक्ष नसल्याने वाढली धोक्याची घंटा

धरणाला पडलेल्या छिद्राचा आकार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

इगतपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील खेड भैरव ह्या गावातील धरणाकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. ह्या दुर्लक्षामुळे ह्या धरणाला काही ठिकाणी छिद्रे पडल्याने पाणी वाहून वाया जात आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर धरण कोरडे होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासह धरणाचे बांधकाम छिद्रांमुळे कमकुवत होत असल्याने ते फुटण्याकडे वाटचाल करीत असल्याची भीती ह्या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव ह्या गावाजवळ जलसंपदा विभागाने काही वर्षांपूर्वी छोटे धरण बांधलेले आहे. ह्या धरणामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होत असतो. मात्र संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची डागडुजी केली जात नाही. त्यामुळे ह्या धरणाच्या खालच्या बाजूने छिद्र पडून पाणी वाहून जात आहे. दिवसेंदिवस हे छिद्र मोठे होत असल्याने पाण्याचा चांगलाच अपव्यय होत आहे. पाणी वाहून जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. यासह छिद्र वाढत असल्याने धरण फुटण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो असे शेतकऱ्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने ह्या धरणाची पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी संदीप खराटे, रंगनाथ कचरे, दीपक परदेशी, अण्णा खराटे, गणपत बोंद्रे, राजाराम वाजे, सागर वाजे, भाऊसाहेब वाजे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

व्हिडिओ पहा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!