इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
4 व 5 डिसेंबरला होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उदघाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ दिल्ली येथील कवी गौहर रझा यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचे आईवडील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचे वडिल शिक्षणतज्ज्ञ, कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य, त्याचबरोबर विज्ञानाचे शिक्षक होते.
गौहर रझा हे व्यवसायाने भारतीय वैज्ञानिक आहेत. ते प्रमुख उर्दू कवी, सामाजिक कार्यकर्ता आणि वृत्तचित्र फिल्म निर्माता आहेत. सामान्य जनतेमध्ये विज्ञानाविषयीची समज वाढवणे आणि लोकप्रिय करणे यासाठी, म्हणजेच वैज्ञानिक लोक विज्ञानाच्या चळवळीच्या सोबत ते काम करत आहेत. गोहर रझा यांचे संपूर्ण कुटुंबच सामाजिक चळवळींमध्ये अग्रेसर राहिलेले आहे. फॅसीझमला बळी पडलेले सफदर हाश्मी हे त्यांचे निकटवर्तीय होते. त्यांनी फुलटायमर असणाऱ्या शबनम हाश्मी यांच्याशी विवाह केलेला आहे. विद्यार्थीदशेपासून डाव्या विद्यार्थी संघटना मधले सक्रिय कार्यकर्ते राहिलेल्या आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांची ‘जंगी आजादी ‘ ही फिल्म राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजली गेली आहे.
गौहर रझा यांनी देशभरातल्या अनेक नामवंत अशा विज्ञान इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेले आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली येथे वीज उपकरण आणि सिस्टीम यामध्ये त्यांनी एमटेक केलेले आहे. आणीबाणीच्या काळात ते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव होते. मुंबई इलेक्ट्रिक इंजिनिअर म्हणून त्यांनी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांचा कवितासंग्रह ‘जज्बो की लाउ तेज केरों को लहजे की ‘ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्याचबरोबर “अंधेरे के दिनो मे एक रोमँटिक कविता लिखने के लिए एक बेबस व्यक्ती” ही कविता गाजलेली आहे. ‘सलाम इंडिया’ हे गाणे देखील त्यांनीच लिहिले आहे. ते समकालीन समस्यांविषयी नेहमी भाष्य करत असतात. देशाच्या भविष्याबाबत अत्यंत मूलगामी चिंतन करणारे विचारवंत म्हणून संपूर्ण भारतीयांना परिचित असणारे शास्त्रज्ञ उडघटनासाठी येणार आहेत. त्यामुळे एक नाशिककरांना मोठी वैचारिक मेजवानी या संमेलनाच्या निमित्ताने मिळणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.