राहुल बोरसे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते येथे हरसुल जिल्हा परिषद गटाच्या सदस्या इंजि. रुपांजली विनायक माळेकर यांच्या सौजन्याने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातुन हजारो स्पर्धक सहभागी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर, युवा नेते मिथुन राउत, वामन खरपडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील स्पर्धकांना आपल्यातले कौशल्य दाखविण्यास संधी मिळावी, अतिदुर्गम ग्रामीण असणाऱ्या हरसुलसारख्या भागातून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे या हेतूने स्पर्धेचे आयोजन केल्याचे प्रतिपादन आयोजक रुपांजली माळेकर यांनी व्यक्त केले. ह्या स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आल्या. यामध्ये धावणे खुला गट ६ किमी मुले, खुला गट ४ किमी मुली, १५ वर्षाखालील मुले आणि मुली २ किमी ह्या गटात स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा स्पर्धेला मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविल्याने मॅरेथॉनमध्ये चांगली स्पर्धा निर्माण झाली होती. यावेळी विजेत्या धावपटूंचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विजेत्यांना शिक्षणाधिकारी अनिल शहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, शिक्षण विस्ताराधिकारी राजदादा आहेर, रुपांजली माळेकर, विनायक माळेकर आदींच्या हस्ते गौरवण्यात आले. सरपंच जानकीराम गायकवाड, उपसरपंच चांगदेव माळेकर, दिनकर चौधरी, सुरेश गायकवाड, स्वप्नील माळेकर, क्रीडा शिक्षक भगवान हिरकुड, शांताराम शेंडे, विठ्ठल मौळे, रामदास गायकवाड, गणेश बारगजे, दिगंबर भुसारे, अनिल बोरसे शिक्षक, निलेश मौळे, जगन पिंपळके, प्रदीप माळेकर, बाळासाहेब चौधरी, विलास चौधरी, परशराम मोंढे, लक्षमण माळेकर, निलेश चौधरी, निवृत्ती चौधरी, गोपाळ माळेकर, पांडुरंग माळेकर, नामदेव माळेकर, राम चौधरी, योगेश आहेर, अंबादास बोरसे, तुकाराम कामडी, प्रशांत चौधरी, वसंत पिंपळके, सरपंच विष्णु बेंडकोळी, सरपंच भगवान बेंडकोळी आदींनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजनासाठी सारस्ते ग्रामस्थांसह परिसरातील शिक्षक, क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी पार पाडल्या.
विजेते स्पर्धक
खुला गट ६ किमी मुले
प्रथम – दयाराम गायकवाड, अंबड
द्वितीय – कुलदीप चव्हाण, संभाजीनगर
तृतीय – दिनकर महाले, गणेशगाव
चतुर्थ – विशाल चव्हाण, चाळीसगाव
खुला गट ४ किमी मुली
प्रथम – दिव्या पिंगळे, वसई
द्वितीय – तुळसा चौरे, उंबरठान
तृतीय – रविना चौधरी, नाचलोंडी
चतुर्थ – ज्योती चव्हाण, SRCVK स्पोर्ट्स
१५ वर्षाखालील मुले २ किमी
प्रथम – श्रावण राठोड, चाळीसगाव
द्वितीय – महेश भोरे, जव्हार
तृतीय – गणेश तारगे, त्र्यंबकेश्वर
चतुर्थ – जनार्दन गावित, नाचलोंडी
१५ वर्षाखालील मुली २ किमी
प्रथम – सानिका चौधरी, नाचलोंडी
द्वितीय – अदिती पाटील, SRCVK स्पोर्ट्स
तृतीय – गितांजली कव्हा, जव्हार
चतुर्थ – नम्रता चौधरी, नाचलोंडी
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत प्रमाणे ग्रामीण भागात धावपटू तयार होण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील खेळाडुंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- इंजि. रुपांजली माळेकर, जिल्हा परिषद सदस्या हरसुल