इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावयाचे झाल्यास त्यासाठी प्रचंड आत्मविश्वासाची जोड लागते. इगतपुरीच्या ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारची सुखसुविधा नसताना देखील त्यावर मात करीत इगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजाच्या अनेकांनी क्रीडा क्षेत्रात अभिमानाने मान उंचावली असून यशाला गवसणी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सलून असोशिएसशनने कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या कुस्तीगीरांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नांदूरवैद्य येथील त्र्यंबक बहिरू डाके यांच्या दोन्ही कन्या आदिती व माधवी यांनी क्रीडा क्षेत्रात नाव नुकतेच उंचावले आहे. मुंढेगाव येथील समाधान सुरेश कडवे याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाने 57 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. पेठ हरसूल येथील चिरापाली महाविद्यालयात इगतपुरीचे नाव उंचावले आहे. याची दखल महाराष्ट्र राज्य सलून असोशिएसशनने घेऊन कुस्तीसाठी लागणारे साहित्य त्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, ॲड. सुनिल कोरडे, प्रदेश संपर्कप्रमुख पंढरी आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, जिल्हा संघटक अशोक सूर्यवंशी, इगतपुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कोरडे, तालुका उपाध्यक्ष गणेश रायकर, सरचिटणीस किरण कडवे, प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण सोनवणे, प्रदीप कडवे, देवराम सूर्यवंशी, गौरव वाघ, निलेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मी क्रिकेटपटू असून मला खेळाडूंच्या समस्यांची जाण आहे. तालुक्यात खेळण्यासाठी अद्ययावत मैदाने नसल्याने अडचणींवर मात करून खेळाडू घडत आहे. नाभिक समाजातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नावलौकिक करीत आहे. त्यांच्या गुणांना वाव मिळवून देण्यासाठी तालुक्यात लवकरच गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच तत्पर आहे.
- एकनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सलून असोशिएसशन