इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
इगतपुरी तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. आज तब्बल ४० कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला. कोरोनामुक्त झालेल्या ह्या व्यक्तींना आज घरी सोडण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार फक्त २५ व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज अखेर एकंदरीत २१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. आरोग्य विभागाकडून कोरोना निर्मूलनाचे काम जोरात सुरू असून नागरिकांनी साहाय्य करण्याची अपेक्षा आहे. नव्याने सुरू झालेल्या एकलव्य कोविड सेंटरमध्ये विजेची समस्या आहे. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी कोविड सेंटरला इन्व्हर्टर आणि बॅटऱ्या दिल्या आहेत.
कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळली तर घाबरून न जाता जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन तातडीने तपासणी करून घ्यावी. कोरोनाचे निदान झाले तरी हा आजार बरा होऊ शकतो हे ध्यानात घेऊन आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावेत. अंगावर आजार काढल्यास जीवावर बेतू शकते. यासह शासनाच्या नियमांचेही पालन करावे असा सल्ला इगतपुरीचे प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रदीप बागल यांनी दिला आहे.
कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.