टिटोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय संविधान दिन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

टिटोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय संविधान दिन संपन्न झाला. २३ ते२६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत शासन निर्णयानुसार संविधान सप्ताह झाला. विद्यार्थ्यांनी रांगोळी, चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल भोपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते संदिप भडांगे यांनी संविधानदिन प्रित्यर्थ सर्व विद्यार्थ्यांना फळे वाटप केली. मुख्याध्यापिका मंगला शार्दुल यांनी संविधानाचे महत्व विशद केले. शाळेतील पदवीधर शिक्षक सिध्दार्थ सपकाळे यांनी शाळेला “संविधान उद्देशिका” फोटो फ्रेम सप्रेम भेट म्हणुन दिली. इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चित्र काढुन सहभाग घेतला. राजकुमार गुंजाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रतिभा सोनवणे, मंगला धोंडगे, योगिता पवार यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!