कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

इगतपुरी तालुक्यात आज तब्बल १३ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला. कोरोनामुक्त झालेल्या ह्या व्यक्तींना आज घरी सोडण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार फक्त ८ व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज अखेर एकंदरीत ७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.

कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळली तर घाबरून न जाता जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन तातडीने तपासणी करून घ्यावी. कोरोनाचे निदान झाले तरी हा आजार बरा होऊ शकतो हे ध्यानात घेऊन आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावेत. अंगावर आजार काढल्यास जीवावर बेतू शकते. यासह शासनाच्या नियमांचेही पालन करावे असा सल्ला इगतपुरीचे प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रदीप बागल यांनी दिला आहे.

मातोश्री हॉस्पिटल, श्रीरामवाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899