इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
मॅरेथॉन स्पर्धा निरामय आरोग्यासाठी बहुगुणी आहेत. ह्या स्पर्धांतून सदृढ युवापिढी आणि देशाला उत्तमोत्तम खेळाडू लाभतात. शहिदांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी माजी सैनिक भाऊसाहेब बोराडे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा सर्वांना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन कळसुबाई मित्रमंडळाने अध्यक्ष प्रसिद्ध गिर्यारोहक भगीरथ मराडे यांनी केले. मुंबईमध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय शहिद मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की इगतपुरी तालुक्यात पदरमोड करून मॅरेथॉन स्पर्धा भरवणारे भाऊसाहेब बोराडे यांचा अभिमान वाटतो. माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे म्हणाले की, शहीद दिनाच्या कार्यक्रमासाठी वर्षभर सुट्या न घेणारे भाऊसाहेब बोराडे प्रामाणिकपणे ११ वर्षांपासून स्पर्धा भरवतात. यामुळे ह्या भागाला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी आहे.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी संविधान दिनही साजरा केला. ह्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत गाडगेबाबा स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत भर थंडीत शेकडो चिमुकल्यासह आबालवृद्धही धावले. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उदघाटन मॅरेथॉन स्पर्धचे उदघाटन उद्योजक खेळाडू हार्दिक चौधरी, उपसरपंच संजय बोराडे, मंगेश राऊत, माजी सैनिक भाऊसाहेब बोराडे यांच्या हस्ते झाले. कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, पत्रकार भास्कर सोनवणे, राष्ट्रीय धावपटू डॉ. महाजन, उत्तम बोराडे, गिर्यारोहक प्रवीण भटाटे आदी मान्यवरांनी खेळाडूंना परितोषिकांचे वितरण केले. मॅरेथॉन स्पर्धेच्या लहान गटात प्रथम क्रमांक कृष्णा बोराडे, द्वितीय राज बोराडे, तृतीय अनुप टाकळकर, मोठ्या गटात प्रथम क्रमांक वेदिका बोराडे, द्वितीय भाविका तोकडे, तृतीय वैष्णवी बोराडे यांनी यश संपादित केले.