वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
घोटी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांसह जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभुमीवर आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य सदस्य उदय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष उमेश खातळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी व गरजु नागरीकांच्या अडचणी मांडुन घोटी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा या मागणीचे निवेदन देऊन विनंती केली. आमदार खोसकर यांच्या विनंतीला मान देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी होकार दिल्याने लवकरच घोटी ग्रामीण रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील घोटी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या लगत ग्रामीण भागातील अनेक गावे, वाड्या वस्त्या घोटीला जोडलेल्या असल्याने उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालय अपुरे पडत होते. उपजिल्हा रुग्णालय झाल्यास या रुग्णालयात एक्सरे, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, प्रसुती, बाल रुग्णालय आदी बरोबरच सर्पदंश, श्वानदंश इंजेक्शन तसेच गंभीर अपघात सारखे गंभीर अवस्थेतील रूग्णांना आता नाशिकला पाठवायची आवश्यकता भासणार नाही अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जि. प. सदस्य उदय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष उमेश खातळे, त्र्यंबकेश्वर तालुक्याचे युवा नेते हरिभाऊ गायकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक सोनवणे आदी उपस्थित होते.