गोंदे जवळ मोटारसायकल अपघातात परदेशवाडी येथील युवक गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केले उपचारासाठी दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

मुंबई आग्रा महामार्गावर थायसन कृप कंपनीजवळ आज सायंकाळी साडेसहा वाजता नासिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये मोटारसायकल क्रमांक MH 16 L 6429 वरील चालकाचे स्लिप होवुन सरफटत गेल्याने त्याच्या डोक्याला  मार लागला. त्याच्या हाताची बोटे मोडून तो गंभीर जखमी झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. रामदास नावजी भगत वय 22 रा. परदेशवाडी खेड भैरव असे जखमीचे नाव आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!