इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी तालुका भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी दौंडत येथील सामाजिक कार्यकर्ते रुग्णमित्र विष्णु पाटील शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन रुग्णमित्र म्हणुनही चांगली भुमिका बजावणारे विष्णु शिंदे ओळखले जातात. त्यांच्या कामाची दखल घेत भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाठे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तु पाटील कापसे यांनी विष्णु पाटील शिंदे यांची निवड केली. आगामी काळात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या व बेरोजगार भूमीपुत्रांच्या प्रश्नावर लढा देऊन न्याय मिळवुन देण्याकामी आपण सतत झटत राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.