…अन्यथा वीज मंडळ कर्मचाऱ्यांना इगतपुरी तालुक्यात फिरकू देणार नाही : भाजपाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

अवकाळी पाऊस आणि अनेक कारणांमुळे इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी खूप मोठ्या संकटात आहेत. त्यातच शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी विज वितरण मंडळाला आघाडी सरकारने दिलेल्या आदेशाने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. सध्याची विजबिलाची रक्कम भरून थकबाकीची रक्कम हळूहळू भरण्यास शेतकरी तयार आहेत. असे असूनही वीज मंडळ शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था जास्तच गंभीर झाली आहे. वीज मंडळाने हे प्रकार तातडीने थांबवावेत अन्यथा महावितरण वीज मंडळ कर्मचाऱ्यांना इगतपुरी तालुक्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा भाजपाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहत असाल तर भाजपातर्फे आक्रमक आंदोलन छेडण्यास भाग पाडू नका असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी राजाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे भात पिक व भाजीपाला पिके बेमोसमी आवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली असुन शेतकऱ्याच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा खुप संकटात सापडला आहे. त्यातच आघाडी सरकार दुखावलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ मिरची चोळत आहे. आज शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे ङिपी बंद करून शेतकऱ्यांना सक्तीने अवाढव्य आलेले वीज बिले पूर्ण भरण्यास सक्ती होत आहे. मोठ्या संकटात असणारा शेतकरी राजा सध्याचे बिल भरण्यास तयार आहे. शासनाने ङिपी बंद करण्याची मोहीम त्वरीत थांबवावी. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या भावना ओळखाव्या अन्यथा इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेङणयाबत येईल. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तालुक्यात फिरकु देणार नाही असा इशारा भाजपा इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कङभाने, तालुका संघटन सरचिटणीस तानाजी जाधव, सरचिटणीस कैलास कस्तुरे, ओबीसी आघाडी तालुका उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!