इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
आज रात्री 9 च्या दरम्यान शेणवड शासकीय आश्रमशाळा ते पाडळी देशमुख रस्त्याने देवळाली कॅम्प येथील चारचाकी वाहन जात होते. ह्या वाहनाला शेणवड महावितरण उपकेंद्राजवळ नागमोडे वळण लक्षात आले नाही. त्यामुळे हे वाहन बाजूच्या तलावात जाऊन पडले. याबाबत नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी कळवले. ते लगेच घटनास्थळी हजर होऊन त्यांनी नागरीकांच्या मदतीने वाहन बाहेर काढले.
ह्या वळणावर सतत असे अपघात होत असल्याची बाब तुकाराम वारघडे यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना कळवली. त्याठिकाणी स्पीड ब्रेकर, वळण दर्शक फलक, वीज, हायमास्ट व कठडा बांधण्याची मागणी करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे श्री. वारघडे म्हणाले. यावेळी खैरे फार्मचे राजाराम धांडे, अक्षय महाराज संस्थान ट्रस्टचे गोकुळ तुंगार, राजाराम बेंडकोळी, संजय बेंडकोळी, संजय वारघडे, नितीन साबळे, कृष्णा डगळे, हरी वारघडे आदी नागरिक उपस्थित होते.