देवळे भागातील ६ फूट जखमी नागावर शस्त्रक्रिया करून जंगलात सोडले : सर्पमित्र प्रवीण भारती व सागर रूपवते यांचा पुढाकार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी तालुक्यातील देवळे येथे मुकेश सुराणा यांच्या राईस मिलवर 6 फूट लांबी असणारा नाग सर्पमित्र प्रवीण भारती व सागर रूपवते यांना जखमी अवस्थेत सापडला. अडगळीतून बाहेर येत असताना पत्र्याने त्याच्या गळ्याजवळचा काही भाग चिरला गेला. सर्पमित्र भारती याने वनविभागास कळवून त्यांच्या परवानगीने पशुसंवर्धन तज्ञ डॉक्टर संजय गायकवाड यांच्याकडे नेले. त्याच्यावर तेथे टाके घालून शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नागाच्या स्थितीत सुधारणा झाल्यावर त्यास आज वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या समोर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!