इगतपुरीनामा न्यूज, दि. २
गेल्या काही दिवसांपासुन इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापल्या आहेत. अनेकांवर ही कारवाई सुरू असुन ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर विजेचे संकट आलेले आहे. ह्या कारवाईमुळे शेतकरी वर्ग हा अडचणीत सापडला आहे. विजेअभावी उभ्या पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने पिके जळण्याचा धोका आहे. यासह दिवाळी सनाच्या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा शेतकरी अंधारात राहतो आहे. यासह बिबट्यांचा देखील वावर मोठ्या प्रमाणावर असुन शेतकरी व त्यांचे कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहेत. शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांनी केली आहे.
आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीचा विचार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी मुरंबीचे सरपंच बापू मते, पांडुरंग पोटिंदे, संतोष मते, अर्जुन ससाणे, प्रतिक गोवर्धने, समाधान गोवर्धने, हिरामण तांबे, दतु मते, रेवण मते, विलास पाडेकर, रतन शिंदे, सुनील पालवे, भास्कर जोशी, सुदाम बेडकुळी, चेतन पावडे, वैष्णव धांडे आदी उपस्थित होते