सुभाष कंकरेज : इगतपुरीनामा न्यूज, दि. २
नाशिक येथील उत्कृष्ट कवी आणि लेखक जी. पी. खैरनार यांना उत्कृष्ट वाङ्ममय २०२१ कादवा शिवार पुरस्कार देण्यात आला आहे. ते जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. साखर संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला.
कादवा प्रतिष्ठानच्या वतीने स्व. माणिकराव माधवराव जाधव यांचे स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट वाङ्ममय २०२१ कादवा शिवार पुरस्कार आणि “गावकुस” काव्य संग्रहाला दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात संपन्न झाला.
ह्या पुरस्कारासाठी कादवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार मिठे व त्यांच्या संपुर्ण कादवा परिवाराने पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना आणि पेन्शनर असोसिएशनच्या वतीने जी. पी. खैरनार यांचे अभिनंदन करण्यात आले.