महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून पत्रकार सदस्यांना विविध साहित्याचे वितरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २
कोविड संसर्ग काळात पत्रकारांची शोध पत्रकारीता महत्वाची ठरली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचुन पत्रकाराने कोविड योध्याची भुमिका बजावली. यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सामाजिक दायित्व म्हणुन मदतीला कायम तत्पर राहिला.
इगतपुरी तालुक्यातील सर्व पत्रकार सदस्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या सुचनेनुसार विविध साहित्य वाटप करण्यात आले. संघटनेच्या सर्व सदस्यांना अद्ययावत ओळखपत्र, डायरी, कॅलेंडर व मास्कचे वाटप पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे यांचे हस्ते करण्यात आले. हॉटेल नर्मदा येथे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी पत्रकार संघाच्या सदस्यांची व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी ह्यावर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक सदस्याने स्वत:चा आर्थिक निधी जमा करून हा निधी संघटनेकडे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निधी केवळ आरोग्याच्या दृष्टीने पत्रकार सदस्यांना वापरता यावा अशी घोषणा करून याबाबत अंबलबजावणी करण्यात आली.
पत्रकार हा समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे. केवळ बातमीसाठी कार्य न करता समाजाचा एक भाग म्हणुन उत्तरदायित्व असण्याची भावना प्रत्येक सदस्यांच्या मनात जागृत व्हावी या करीता पत्रकार संघाच्या वतीने उपक्रम राबवले जातात. ह्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान, कोविड काळात कोविड सेंटरला मोफत पीपीई किट वाटप, गरीब गरजु कुटुंबांना मोफत धान्य वाटप, भाजीपाला वाटप आदींचा समावेश आहे. हे कार्यक्रम राबवुन समाजात एक आपुलकीचे नाते तालुका पत्रकारांनी कोवीड काळात केल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जनमानसात कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांनी आपले मत मांडले. या वेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पोपट गवांदे, सचिव राजेंद्र नेटावटे, उपाध्यक्ष राजेश देवळेकर, कार्याध्यक्ष वाल्मीक गवांदे, भास्कर सोनवणे, गोपाळ शिंदे, सुनिल पहाडे, सतिष पुरोहित, गणेश घाटकर, शैलेश पुरोहित, सुमित बोधक, शरद धोंगडे, राहुल सुराणा, विकास काजळे, एकनाथ शिंदे, ओंकार गवांदे, आदींसह पत्रकार सदस्य उपस्थित होते.