( लेखाच्या सुरुवातीसच मी हे असं काहीतरी सुरू करावं ह्यासाठी माझे बरेच रुग्ण,मित्र व त्यात विशेषतः माझे मित्र व पत्रकार श्री.भास्कर सोनवणे माझ्यामागे लागले होते,ह्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. )
आरोग्य प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे ऍलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी असे विविध वैद्यकीय उपचार घेतले जातात.आरोग्याची विभागणी शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य व अध्यात्मिक आरोग्य अशी तीन विभागात केली गेली आहे.शरीर व मन यांना आपण एकमेकांपासून विभक्त करू शकत नाही. रोगलक्षणे फक्त शारीरिक असली तरी त्यांचा परिणाम मनावर होत असतो. उदा.”क्ष” व्यक्ती आजारी पडल्यावर डॉ कडे लगेच पळतो, कारण त्याला आजार जास्त वाढू नये याची काळजी असते,तर तीच दुसरी “अ” व्यक्ती ला त्याच आजारात कामधंदा बुडू नये यासाठी लवकर बरं व्हायचं असतं म्हणून तो डॉ कडे लगेच पळतो,तर “ब”व्यक्तीस डॉ कडून इंजेक्शन वगैरे सारखी इजा होण्याची भीती असेल म्हणून जाणे टाळेल.
याचप्रमाणे काही मानसिक व्याधींमध्ये रोगाचा परिणाम शरीरावर होतच असतो. काही रोगांमध्ये शारीरिक व मानसिक दोन्हीही लक्षणे असतात.
ऍलोपॅथीमध्ये रुग्णाची लक्षणे पाहून त्या त्या व्याधीनुसार उपचार केले जातात.
आयुर्वेदामध्ये रुग्णाच्या लक्षणाबरोबर नाडी परीक्षण, उदर परीक्षण, सप्तधातू इत्यादींची विचार करून चिकित्सा केली जाते.
होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची Constitutional (सार्वदेहीक) मेडिसीन निश्चित केले जाते. ज्यामुळे रुग्णाचे शारीरिक व मानसिक संतुलन साधले जाते.काही वेळा आजाराच्या तरुण अवस्थेमध्ये त्या त्या लक्षणानूसार तत्कालीक औषधे दिली जातात. तर व्याधीचा पुनरुद्भव टाळण्यासाठी Intercurrent medicines दिली जातात.अशी असते होमिओपॅथी… मानसिक लक्षणांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास फक्त होमिओपॅथिमध्येच केला जातो. होमिओपॅथी ही एक नैसर्गिक चिकित्सा पद्धती आहे. औषधे चवीला गोड, घेण्यास सुलभ आहेत. त्यामुळे जन्मलेल्या बाळापासून वृद्धांपर्यंत सर्व आनंदाने घेतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. रोगाचा समूळ नाश होतो. औषधाची मात्रा अतिशय कमी असल्याने साईड इफेक्ट नाहीत. तत्काळ व्याधींमध्ये काही सेकंदातच चांगला फायदा मिळतो. ताप-सर्दी-खोकला, अतिसार, उलटी, आम्लपित्त यासारख्या आजारांवर लवकरच उपशय मिळतो. संधीवात, मूळव्याध, मूतखडा, सोरायसिस, दमा, ऍलर्जी, कॅन्सर, यकृत विकार, किडणी फेल्युअर इत्यादी जुनाट व गंभीर आजारांवर होमिओपॅथिक उपचाराने नियंत्रण मिळविता येते.लहान मुलांचे विकार,ऍलर्जी,दमा,पित्त, पुरळ उठणे,जुन्या जखमा, न भरणाऱ्या जखमा,तळपाय व हातावर पडणारे घट्टे,मोस, गुप्तरोग, स्त्रियांचे आजार, वंध्यत्व(स्त्री व पुरुष) व डिप्रेशन, सीजोफ्रेनिया इत्यादी अनेक मानसिक विकारात विशेष उपयुक्त आहेत.
होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचं समूळ उच्चाटन होतं, ताप्तुरता उपचार होमिओपॅथीत नाही. तेव्हा होमिओपॅथीचे उपचार घेताना संयम ठेवणे,(सर्वात महत्वाचे), फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. होमिओपॅथीचा कोणताही साईड इफेक्ट नाही.
आजच्या लेखात एवढंच,बाकी पुढील भागात लिहतो.लेख आवडल्यास नक्की शेअर करा व आपल्या काही शंका असतील तर त्या कमेंट मध्ये नक्की विचारा किंवा व्हाट्सएप करा .
संपर्कासाठी – डॉ. प्रदीप बागल,मातोश्री होमिओपॅथी क्लिनिक, वरची पेठ,इगतपुरी, जिल्हा,नाशिक.संपर्क नंबर 9270118140. ( ऑनलाइन कंसलटिंग उपलब्ध आहे,ज्यामुळे प्रत्यक्ष क्लिनिकला न येताही माहिती घेतली जाऊ शकते ).