
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
महिला प्रत्येक क्षेत्रात चांगले कार्य करत असून त्यांना कुटुंबातून मिळणारा भरभक्कम आधार सक्षम बनवतो असे प्रतिपादन आमदार राहूल ढिकले यांनी केले. सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या सावित्रीबाई फुले महिलारत्न पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पश्चिम विभागाच्या सभापती वैशाली भोसले होत्या.
प्रारंभी सौजन्य महिला संस्थेच्या अध्यक्षा पुर्वा मिठारी यांनी प्रास्तविकाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन, संस्थेचे कार्य व उपक्रमांबद्दल माहिती दिली. यावेळी इफकोच्या संचालिका साधना जाधव यांनी महिलांचे सर्व ठिकाणी योगदान असून आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे असे सांगितले. यावेळी नाशिक आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी नानासाहेब पाटील, सभापती वैशाली भोसले, अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार देवरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी एएसआय हॉस्पिटलच्या सौजन्याने महिलांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.
सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले महिलारत्न व समाजरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्रतिभा सोनार, डॉ. अश्विनी दापोरकर, विजया लिलके, अश्विनी गायकवाड, अश्विनी शिंदे, शिल्पा वाघ, माया पोटे, मनिषा कोकरे, ऊर्मिला चव्हाण, ॲड. जयश्री महालपुरे, लता वाघ, डॉ. मनिषा गुरव, विद्या तंवर, मंगला काकड, चेतना सेवक, शिल्पा झारेकर, तनुजा घोलप भोईर, रत्ना महाले बोराडे, सिमा जाधव, अस्मिता अहिरे, पुनम डोखळे, कु. हर्षदा बांदल, नुपूर ठाकूर, शिवरूद्र फार्म्स यांचा समावेश होता. नुपूर डान्स इन्स्टिट्यूटतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी रविंद्र मालुंजकर यांनी केले तर आभार ॲड. अनिता जगताप यांनी मानले.
