आगरी समाजाच्या वतीने इंदिरा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन माळी यांचा सत्कार

वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

घोटी येथे आगरी समाजाच्या वतीने इंदिरा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन माळी यांचा सत्कार संपन्न झाला. जनार्दन माळी यांनी आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहुन केलेल्या कार्याची माहिती यावेळी अनेकांनी मनोगतातून व्यक्त केली. गावचे सरपंच ते इंदिरा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हा प्रवास खरोखरच संघर्ष करणारा ठरला. माळी यांच्या सर्व कामांची दखल घेऊन ही मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे, प्रदेश उपाध्यक्ष हे पद तालुक्यासाठी व सर्व समाजासाठी अभिमानाची बाब आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी आगरी समाजाचे उपाध्यक्ष दौलत दुभाषे, इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, आगरी समाज विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण, माजी उपसभापती अर्जुन आडोळे, रामचंद्र म्हसणे, जी. पी. चव्हाण, प्रकाश तोकडे, विश्वस्त राजेंद्र भटाटे, बाबुराव भोर, ज्ञानेश्वर कडु, माजी सरपंच मल्हारी गटखळ, पंकज माळी, गोपाळ भगत, बाळासाहेब लंगडे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आगरी समाज विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण यांनी केले. यावेळी मच्छिंद्र भगत, बाळासाहेब लंगडे, झुंगजी लायरे, उत्तम लहाने, नारायण वळकंदे, प्रल्हाद भटाटे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भटाटे, विलास जोशी, राजु जोशी, सरपंच पंढरी लंगडे, ईश्वर दालभगत, शाम चव्हाण, उपसरपंच पिंटू चव्हाण, गोरख दुभाषे, बाळासाहेब म्हसणे, विजय म्हसणे, वसंत भागडे, वसंत चव्हाण, भरत भागडे, गोपाळ बोंडे, अंकुश तोकडे, किसन कडु, सोनु चव्हाण, निवृत्ती तुपे, नंदु भटाटे, गोरख दुभाषे, रमेश मानवेढे, जंगलु तोकडे, गुलाब कडु, पोलीस पाटील काळु भागडे, गोकुळ चव्हाण, निवृत्ती चव्हाण, उत्तम गतीर, मुकुंद नवले, रामदास चव्हाण, महादेव दळवी, दिलीप दुभाषे, मनोहर चव्हाण, योगेश चव्हाण, दिपक चव्हाण, लक्ष्मण दुभाषे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!