इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी बौद्धिक संपदा हक्क म्हणजेच पेटंट मिळविण्यासाठी विविध संशोधन प्रकल्प हाती घेऊन गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. जगाबरोबर शैक्षणिक प्रगतीत आपण मागे राहाता कामा नये असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क याविषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते. याप्रसंगी पेटंट विषयाचे अभ्यासक पल्लवी कदम, शलाका टोले, ॲड. रोहित देशपांडे, डॉ. अमोल काटेगांवकर, डॉ. हिरालाल सोनवणे यांनी या चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आज उच्च शिक्षणक्षेत्रामध्ये गुणवत्तेला आणि संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले असून या क्षेत्रात आता सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे. प्रारंभी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी स्वागत केले. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. एस. दुगजे यांनी केले. आभार गुणवत्ता सेलचे प्रमुख प्रा. एस. एस. परदेशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. सी. डी. चौधरी, प्रा. एस. एम.पवार, प्रा. जे. एस. जाधव, प्रा. ए. एस. वाघ, प्रा. के. के. चौरसिया यांनी परीश्रम घेतले.